Spread the love

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ कामगार नेते शिवाजी जाधव हे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मावळ लोकसभा निवडणुकीत आता तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात फॉरवर्ड ब्लॉकने पहिल्यांदाच शिवाजी जाधव यांच्या माध्यमातून आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिला आहे. मावळ लोकसभा निवडणुकीत फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार

शिवाजी जाधव यांना शेतकरी कामगार पक्ष, भारत राष्ट्र समिती पक्ष, यांच्यासह मावळा संघटना, महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समिती, क्रांतिसूर्य सोशल फाऊंडेशन आणि क्षत्रिय मराठा फाऊंडेशन अशा वेगवेगळे पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. पाठिंबा मिळालेले सर्व पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून मावळ लोकसभा 2024 च्या निवडणुकीत माझा निश्चितच विक्रमी मतांनी विजयी होईल असा विश्वास शिवाजी जाधव यांनी पिंपरी चिंचवड शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

 

मावळ लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि कामगार वर्ग आहे. या भागातील शेतकऱ्यांचे आणि बेरोजगार कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. सध्या केंद्रात असलेल मोदी सरकार मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे खाजगीकरण करत आहे. उद्योगधंदे परराज्यात चालले आहेत. मावळातील गडकिल्ल्यांसह पर्यटनाचा विकास खुटलेला आहे. मावळातील पवना बंदिस्त पाईपलाईन चा प्रश्न रखडला आहे. मावळातील दुर्गम भागात अजूनही रस्ते आणि वीज पुरवठा झाला नाही आहे. या सर्व प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी मी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. त्यामुळे मावळातील जनता यावेळी माझ्यासारख्या भूमिपुत्राच्या पाठीशी निश्चितच उभे राहून मला विक्रमी मतांनी विजयी करणार असा विश्वास शिवाजी जाधव यांनी व्यक्त केला आहे.

 

देशात सध्या मोदी आणि भाजपाची हवा नसून देशातील मतदारात अंडर करंट हा वेगळाच आहे. मतदारातील अंडर करंट हा प्रस्थापितांच्या विरोधात जाणारा असल्याने ह्या निवडणुकीत. प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारा व्यतिरिक्त आम्ही एक पर्याय फॉरवर्ड ब्लॉक च्या माध्यमातून दिला आहे. असा दावा शिवाजी जाधव यांनी पत्रकार परिषद बोलताना केला आहे.

मावळातील 25 लाख मतदारात आम्ही यापूर्वीच पोहोचले असून. पुढील दहा दिवसात आम्ही प्रबळ स्पर्धक आणि दावेदार म्हणून मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत. असा विश्वास देखील शिवाजी जाधव यांनी व्यक्त केला आहे

 

चिंचवड येथील पत्रकार परिषदेचे नियोजन आणि सूत्रसंचालन भारत राष्ट्र समिती पक्षाचे कोकण मुंबई विभागीय समन्वयक विजय मोहिते यांनी केले. याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे नेते चंद्रशेखर पाटील, मावळा युवा संघटनेच्या नेत्या रूपाली पाटील, भोसरी विधानसभा समन्वयक (BRS)वाजीद सय्यद, पिंपरी विधानसभा समन्वयक(BRS) सौ प्रफुल्ला मोतलिंग,क्रांतीसूर्य सोशल फौंडेशन संस्था पक अध्यक्ष राजेंद्र देवकर यांच्यासह पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *