

पिंपरी : प्रतिनिधी
“केंद्र सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणांमुळे कामगार वर्ग व तसेच वाढती बेरोजगारी व महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला स्थलांतरित केल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये मोदी सरकार विषयी तीव्र रोष दिसून येत आहे.”
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ दिघी गाव,आणि मार्केट परिसर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि महिला पदाधिकारी तर्फे पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी दिघी भागातील प्रमुख पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी “महिलाअध्यक्षा ज्योतीताई निंबाळकर म्हणाल्या की, प्रचार करताना महिला वर्गांशी संवाद साधला असता केंद्र सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणांवर प्रचंड नाराजी दिसत आहे, वाढती महागाई शिक्षणाचे बाजारीकरण व देशातील महिलांविषयी असुरक्षिततेची असलेली भावना यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी असल्याचे दिसून येत आहे असे महिला अध्यक्ष म्हणाल्या”
यावेळी युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर अनिकेत गायकवाड़,सिद्धांत कसबे, प्रशांत जाधव,अरबाज शेख,विशाल धस,अनिकेत बिरंगल,रजनीकांत गायकवाड़,स्वप्नाली आसोले,कल्पना घाडगे,ताहिरासय्यद,रजनीकांत गायकवाड आणि कार्यकर्ते उपस्तिथ होते.