पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर येथे सुमारे ४ एकर क्षेत्रात, आत्याधुनिक सर्व सोयीसुविधायुक्त योगा पार्क बांधण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत आतापर्यंत ३२४ कोटींची विविध विकास कामे करण्यात आले आहेत. यापैकी स्मार्ट सिटी अंतर्गत योगा पार्क विकसित करण्यात आले आहे.
हे योगा पार्क याच जुन महिन्याच्या अखेरेस नागरिकासाठी खुले करण्यात येणार आहे. सुरूवातीला या पार्कमध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही परंतु या पार्कची निगराणी राखण्याकरीता या पार्कमध्ये येण्यासाठी वेळ व प्रवेश शुल्क ठरवले जाईल. यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने प्रति व्यक्ती ५ किवां १० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. जेणेकरून या पार्कचे महत्व व काळजी राखली जाईल. या पार्कमध्ये नागरिकासाठी क्लाइबिंग गेम्स, स्केटिंग, स्पेशल योगा सभागृह, मैदान असेल तसेच लहान मुलासाठी स्वतंत्र खेळणी असतील तसेच प्रशस्त वॅाकीग ट्रॅक असेल हे योगा पार्क पिंपळे सौदागरच्या विकासत भर असणार आहे तसेच या योगा पार्कमुळे नागरिकाना स्वतंत्र पार्कचा अनुभव घेता येणार आहे.
या पार्कचे काम लवकर पुर्ण करण्यात व हे पार्क लवकर खुले व्हावे म्हणुन मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी वेळोवेळी मनपा विभागाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्यास यश म्हणुन हे पार्क लवकरच जून महिना अखेरीस खुले होत आहे.