पिंपरी : प्रतिनिधी
नाना काटे सोशल फौंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण येथे आंतरराष्ट्रीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक “श्री.हसनजी तफ्ती” यांनी उपस्थिती लावत सर्वांना योगाबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी मा. विरोधी पक्षनेते नाना काटे, चंद्रकांत तापकीर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खुळे, प्रशांत सपकाळ, सतिश डोंगरे, काळुराम कवितके, उमेश काटे, सुमित डोळस, जॉन डिसुझा, विशाल बोत्रे, विशाल काळे, सचिन देसाई, गौरव शितोळे, श्री.शशांक खांडेकर, श्रीमती निशा शुक्ला, श्रीमंती उमा कुलकर्णी, रहाटणी पिंपळे सौदागर मधील आर्ट ऑफ लिव्हिंग चे सदस्य उपस्थित होते. आयोजित कार्यक्रमानिमित्त परिसरातील जेष्ठ नागरिक, माता भगिनी, तरुण-तरुणी, सोसायटी मधील नागरिक, हॉली इंग्लिश मेडीयम स्कुल चे विद्यार्थी तसेच योगा प्रेमी यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवत योग शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थिती होती.