तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. संदीप गोरे, प्रज्वल रामसे, किशोरी लांडगे, निखिल सूर्यवंशी यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी योगासने केली.
या प्रसंगी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी रोज योग करण्याचा संकल्प केला. प्राचार्य डॉ. विलास देवतारे यांनी योगाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रा. राजेंद्र लांडगे यांनी केले. योग शिक्षक प्रा. सिमा महाळुंगकर यांनी आभार मानले. तर प्रा. भीमराव गायकवाड यांनी नियोजन केले.