उमरगा : प्रतिनिधी
उमरगा येथील माऊली इंटरनॅशनल सी बी एस ई शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज भोसले जयंती साजरी करण्यात आली. प्रथमता प्रशालेच्या मुख्याध्यापिका व संस्थेच्या अध्यक्षा सौ मंगल शिंदे मॅडम,कुलस्वामिनी बहुउद्देशीय संस्थेचे सेक्रेटरी यांनी प्रतिमेचे पूजन केले. त्या नंतर प्राध्यापक श्री विजय सगर यांनी छ. शाहूमहाराज यांच्या जीवनावर सखोल माहिती सांगितले.
कार्यक्रमासाठी शाळेचे उपप्राचार्य श्री. श्रीशैल्य मुलगे सर, मॅनेजमेंट विभाग प्रमुख श्री. संजीव राठोड, संगणक विभाग प्रमुख श्री धीरज घोगे, प्रा. लक्ष्मण जाधव, श्रीमती भाग्यश्री वाघमारे मॅडम,ममता गायकवाड, सना तंटे मॅडम,सुजाता जाधव मॅडम,पूजा मॅडम,वसुंधरा तिवारी मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ईश्वर सोनकवडे यांनी केले. शेवटी विद्या जाधव मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
About The Author
