तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात हिंदवी स्वराज्याच्या प्रथम महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार यांच्या २७१ व्या पुण्यातिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्याधिकारी ममता राठोड व माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्रीमंत वृशालीराजे दाभाडे, श्रीमंत दिव्यलेखाराजे दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, आनंद दाभाडे, व्यवस्थापिका रुपाली दाभाडे, बजरंग जाधव, सुबोध दाभाडे, अर्चना दाभाडे, पतसंस्थेचे व प्रतिष्ठानचे सर्व सभासद तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ऍड. विनय दाभाडे यांनी सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा इतिहासाचा आढावा व्यक्त करून सूत्र संचालन केले.