Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संग्राम जगताप मित्र परिवार व हरिओम ग्रुप यांच्या वतीने भारतीय संविधान या विषयावर ज्येष्ठ विधीज्ञ व विधी विष्णात ज्ञानेश्वर केदारी यांचे सुश्राव्य व्याख्यान हॉटेल ड्रिम लंच येथे संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर व प्रमुख पाहुणे म्हणून मावळ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे व पत्रकार राजेश बारणे उपस्थित होते.

यावेळी अरविंद करंदीकर, संजय भागवत, सुरेश घंगाळे, अंकुश दाभाडे, ॲड. गणेश जगताप,ॲड सुरेखा जगताप, तानाजी मराठे, रो. संजय वाघमारे, पत्रकार रेखा भेगडे, इच्छापूर्ती संघटनेचे सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद निकम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रणव जगताप, संकेत बनसोडे,प्रथमेश धूमाळ,प्रणाली हर्षल घोटकूले , अमित बांदल यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *