तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ मावळ व लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी पवना विद्या मंदिर पवनानगर येथे परिसरातील पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी वसंत हंकारे सरांच्या ‘बाप समजावून घेताना’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी परिसरातील दोन हजार विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपला सहभाग नोंदवला. सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पवना विद्या मंदिराचे प्राचार्य भाऊसाहेब आगळणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर रोटरी मावळचे अध्यक्ष रो.नितीन घोटकुले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
या प्रसंगी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे व रोटरी मावळच्या उपाध्यक्षा रो.रेश्मा फडतरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर संचालक रो अँड.दीपक चव्हाण यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
व पुढील दीड तास श्री वसंत हंकारे सरांचे ‘बाप समजावून घेताना’ या व्याख्यानाला सुरुवात झाली.हे व्याख्यान सुरू असताना दोन हजार विद्यार्थी व पालक तसेच उपस्थित प्रत्येक जण भारावून गेला होता अनेक विद्यार्थ्यांना आपल्या भावना अनावर झाल्या, अनेक विद्यार्थ्यांनी अश्रुवाटे आपल्या भावना व्यक्त केल्या. हंकारे सरांनी या व्याख्यानाद्वारे उपस्थित प्रत्येकाच्या काळजाला हात घातला. दीड तास सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन या व्याख्यानाचा आस्वाद घेत होते. लेखक,युवा व्याख्याते, समाज परिवर्तनकार, तथा राष्ट्रभूषण पुरस्कार, भारतीय नवजवान पुरस्कार व छत्रपती पुरस्कार विजेते श्री वसंत हंकारे सरांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना आई व बाप दोन्ही समजावून सांगितले.
या कार्यक्रमासाठी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी बबनराव गवारे, गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज रोटरी मावळचे संस्थापक रो.मनोज ढमाले, सेक्रेटरी रो.पूनम देसाई, प्रकल्प प्रमुख रो.राजेंद्र दळवी.संचालक रो.सुनील पवार, रो.नवनाथ चव्हाण, रो. निकिता घोटकुले, रो.संदीप बोडके, रो.पूजा बोडके, रो.विशाल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आरती म्हाळसकर,पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन धनाजी कोयते, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, विजया म्हेत्रे, हेड कॉन्स्टेबल जय पवार,चपटे,सिताराम बोकड,वारू कोथुर्णे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय ओव्हाळ,श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय शिवलीचे मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव संकल्प इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बऊर शाळेचे मुख्याध्यापक नामदेव गाभणे,काले केंद्राचे केंद्रप्रमुख पांडुरंग डेंगळे, संजय ठाकर धोंडीबा घारे, गोरख जांभुळकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत काळे व वैशाली कोयते यांनी केले तर प्रकल्प प्रमुख रो.राजेंद्र दळवी यांनी उपस्थित यांचे आभार मानले.