तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
प्रसारक संघ आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महा परिनिर्वाण दिनाच्या पूर्व संध्येला सायंदीप यात्रा काढण्यात आली यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सदर सायंदीप यात्रा भांगरवाडी येथील लोहगड उद्यान विर सावरकर स्मारका पासून प्रारंभ करण्यात आला.
लोणावळा नगरपरिषद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करत सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्धविहार येथील अस्थी कलशाचे सर्व भीम सैनिकांनी आंबेडकर वादी नागरिकांनी दर्शन घेतले.यावेळी प्रज्ञा प्रसारक संघाचे सल्लागार मिलिंद सोनावणे प्राध्यापक अशोक येढे,अनिल धेंडे,अशोक आल्हाट,विठ्ठल अहिरे,मंडळाचे अध्यक्ष दीपक वाघमारे,सचिव अनिल गायकवाड,मंगेश सदावर्ते,सिद्धार्थ कांबळे,मोहन जगताप,संजय गायकवाड,महिला अध्यक्षा रुपकमल धेंडे,सचिव मुख्याध्यापिका सरोज ताई, श्रद्धा गुप्ते,मालतीताई खरात यांचे सहकार्य लाभले.भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वस्त समितीचे अध्यक्ष यांनी महपरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शन केले.