तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
भारतीय नौदल आय.एन.एस शिवाजी व लोणावळा नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४/१२/२०२४ रोजी डॉ.बी.एन. पुरंदरे बहुविध विदयालयाचे प्रांगणात सायंकाळी ६ वाजता नेव्ही डे साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत सदर ठिकाणी नेव्हल बॅड मार्फत वाद्यवृंद (Orchestra) कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
लोणावळा परिसरातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून भारतीय सैन्याची कडक शिस्त आणि आपल्या देशासाठीची भक्ती आणि समर्पण याचे दर्शन होणार आहे. तरी सर्व पाल्य आणि पालक यांनी भारतीय सैन्याकडे देशाभिमान आणि करियर या दोन्ही दृष्टीने पाहावे व या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशाचा अभिमान वाढवावा असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांनी लोणावळा नगरपरिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत केले.