तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
येथील शिवशाही दुर्गाभ्यास परिवारातर्फे दिनांक 15 डिसेंबर रोजी एक दिवसीय अभ्यास सहल धर्म गड संग्राम गड श्री क्षेत्र सिद्धटेक छत्रपती संभाजी महाराज समाधी आणि मस्तानीबाई साहेब समाधी या ठिकाणी आयोजित केली आहे.
या सहलीसाठी प्रतिव्यक्ती रुपये 2000 आकारले जाणार आहेत. त्यात नाश्ता चहा सकाळ संध्याकाळीचे जेवण याचा समावेश असणार आहे. सहल सकाळी 5.00 वाजता सुरु होणार आहे. सहल ज्या ठिकाणाहून निघणार व परतीचे ठिकाण राजगुरव कॉलनी असणार आहे. यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.
या सहलीसाठी आराम बसचे आपले आसन निश्चित करण्यासाठी डॉ. प्रिया बोराडे ह्यांना संपर्क करावा. अधिक माहितीसाठी 9975335029, 9822717447 यावर संपर्क करण्यात यावा.