तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
कलापिनी आयोजित एकपात्री अभिनय आणि नाट्यछटा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे यंदा २९ वे वर्ष होते. बालवाडी ते खुला गट अश्या ह्या स्पर्धा होत्या.
हर्षल आल्पे, मधुवंती हसबनीस, चंद्रशेखर जोशी आणि श्रेया रहाळकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. पारितोषिक वितरण समारंभासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष किरण हजारीमल ओसवाल आणि हास्यजत्रा फेम कलाकार प्रियांका हांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले. किरण ओसवाल यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना औक्षण करून, भेट वस्तू देऊन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी खूप शुभेच्छा देण्यात आल्या. प्रियांका हांडे यांचा सत्कार कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांचे हस्ते करण्यात आला. कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी मनोगत व्यक्त करताना कलापीनीत चालू असणाऱ्या बालभवन, कुमारभवन तसेच महिला मंच आणि इतर अनेक उपक्रमाविषयी माहिती दिली ज्योती ढमाले ह्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना चंद्रशेखर जोशी सरांनी सादरीकरण अजून जास्त चांगले होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
प्रमुख अतिथी प्रियांका हांडे म्हणाल्या, “कलापीनी आणि तळेगावशी खूप जवळचे नाते आहे. त्यामुळे मी खूप मोठी कलाकार नसून तुमच्यातलीच एक आहे. कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सततप्रयत्न करणे गरजेचे आहे. संस्थेच्या कार्याला आणि विद्यार्थ्याना खूप शुभेच्छा.”
किरण ओसवाल म्हणाले, “माझा आजचा वाढदिवस अविस्मरणीय असा साजरा झाला आहे. आमच्या लहानपणी आम्हाला हे सगळे मिळाले नाही याची मला खंत वाटते. रोटरी क्लबच्या माध्यमातून कलापिनीचा एक उपक्रम नक्की राबविण्यात येईल.”
कलापपिनीचे उपाध्यक्ष तसेच स्पर्धा प्रमुख अशोक बकरे यांनी आगामी काळात कलापिनीत होणाऱ्या चित्रकला, नाट्यवाचन स्पर्धांची माहिती दिली. दिपाली जोशी यांनी आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले आणि श्लोक म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता दिवेकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लीना परगी,दिपाली जोशी, सोनाली पाडळकर, नीता धोपाटे, माधवी एरंडे, भाग्यश्री हरहरे ,रश्मी पांढरे,अनघा बुरसे, केतकी लिमये, श्रीपाद बुरसे , दीपक जयवंत, पांडुरंग देशमुख, किसन शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिक मेहता, विजय कुलकर्णी आणि चेतन पंडित यांनी तांत्रिक सहाय्य केले.
कलापिनी नाट्यछटा व एकपात्री अभिनय स्पर्धा २०२४ निकाल पुढीलप्रमाणे
गट बालवाडी
प्रथम क्रमांक – इरा विजय कुलकर्णी (सी. केजी. बालविकास विद्यालय)
द्वितीय क्रमांक -तनिष्का शिंदे, (नर्सरी किडझी)
तृतीय क्रमांक- अगस्त भरड, (बालवाडी छोटा गट सरस्वती विद्या मंदिर.)
उत्तेजनार्थ -ईरा संतोष साळवी, (सि. केजी, जैन इंग्लिश स्कूल.) ओम सुनील ताठे,(सिनियर केजी. बालविकास विद्यालय.)
प्रोत्साहन पर :-शार्वी शिरीष देसाई ,(सि. केजी. ताई आपटे शिशु वाटिका.),अबीर पटवर्धन, (ज्युनिअर केजी किडझी स्कूल),शाल्मली खोल्लम, (सीनियर केजी प्रज्ञानबोधिनी शाळा शिरगाव.)
गट -पहिली व दुसरी.
प्रथम क्रमांक -प्रत्युषा अमोल नवले (दुसरी, पैसा फंड शाळा ब)
द्वितीय क्रमांक -अद्वैता विशाल कुलकर्णी ( २ री, बालविकास विद्यालय)
तृतीय क्रमांक – कल्याणी काकासाहेब थोरवे (दुसरी, सरस्वती विद्या मंदिर)
उत्तेजनार्थ – आरोही अनंत मानकर (पैसा फंड शाळा.),आरवी प्रशांत म्हाळसकर (पैसा फंड शाळा)
प्रोत्साहनपर :- राही अभिजीत गुजरे (दुसरी,सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल), नक्षत्रा मयूर पिंगळे ( पहिली,जैन इंग्लिश स्कूल.), विवान अमोल बेले ( पहिली,पैसा फंड शाळा) स्वरा श्रीपाद देशमुख (दुसरी,माउंट सेन्ट ॲन)
गट- तिसरी, चौथी :–
प्रथम क्रमांक -आरती कटरे ( पैसा फंड शाळा अ)
द्वितीय – प्रांजल प्रशांत पाटील (पैसा फंड शाळा)
तृतीय क्रमांक – अर्णव सागर यादव (सरस्वती विद्यामंदिर)
उत्तेजनार्थ- स्वरा शिंदे (प्रज्ञानबोधिनी, शिरगाव) ,ऋचा वैभव कुलकर्णी,( पैसा फंड शाळा)
प्रोत्साहनपर :– वैष्णवी खाडे ( प्रज्ञान बोधिनी शिरगाव),सुज्वल पंकज मालुंजकर (पैसा फंड शाळा.),
ईरा उमेश करपे ( सरस्वती विद्यामंदिर.),ओवी राहूल वीर (सह्याद्री इंग्लिश)
गट पाचवी ते सातवी :–
प्रथम क्रमांक- मनवा वैद्य ( पाचवी माउंट सेंट अँन विद्यालय.)
द्वितीय क्रमांक -अन्वय सुमित धोपाटे (सहावी ,आदर्श विद्यामंदिर)
तृतीय क्रमांक- मुग्धा महादेव भालशंकर, (पाचवी, रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन)
उत्तेजनार्थ -जान्हवी हिंगे (सहावी, नवीन समर्थ विद्यालय.), पूर्वा कदम, (सहावी, प्रज्ञान बोधिनी शिरगाव.)
प्रोत्साहनपर -:— प्राची प्रमोद खंदारे ( सातवी सह्याद्री इंग्लिश स्कूल),चिन्मय रवींद्र फल्ले (सातवी सह्याद्री इंग्लिश स्कूल), विवान रुपनवर (हचिंग स्कूल)
गट -:–आठवी ते दहावी
प्रथम क्रमांक- मेधांश जितेंद्र पाठक ( बालविकास विद्यालय)
द्वितीय क्रमांक- श्रेया शैलेश साळुंके( सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल.)
तृतीय क्रमांक – ऋग्वेद किरण अराणके ( सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल.)
उत्तेजनार्थ – शर्वरी सचिन पायघन, (सरस्वती विद्या मंदिर), समृद्धी रामेश्वर मांजरखेडे (आदर्श विद्यामंदिर.)
खुला गट :-
प्रथम क्रमांक – मीरा क्षिप्रसाधन भरड.
द्वितीय- कीर्ती राहुल देसाई .
तृतीय क्रमांक- मीरा बेडेकर
उत्तेजनार्थ – जान्हवी पावसकर, नेहा पोळकर. प्रोत्साहन पर : ऐश्वर्या महेंद्र शेलार