तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
शाळेचे द्वितीय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमाचे स्थान द्वारकाधीश लॉन, वडगाव मावळ हे असणार आहे.
मुलांना प्रोत्साहन व पालकांशी संवाद साधन्यासाठी श्रीमंत सरदार सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, श्रीमंत सरदार याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार तसेंच प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ.प्रमोदजी बोराडे व इतिहास संशोधिका डॉ.प्रिया बोराडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आपल्या पाल्याला उत्कृष्ठ शाळा कोणती असावी याचा शोध ब्रह्मांड पूर्व प्राथमिक शाळेत येऊन थांबेल असा विश्वास स्कुलच्या संस्थापक प्रा.चित्रा सचिन मोहिते यांनी विश्वास व्यक्त केला आहे.