तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे येथील नव्याने स्थापन झालेल्या सहयोग फाउंडेशनच्या वतीने मावळ तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना सॅनिटायझर पॅडचे वाटप नुकतेच करण्यात आले.
पवन मावळातील सोमाटणे येथील श्री तुळजाभवानी विद्यालय, परंदवडी येथील बा.न. राजहंस विद्यालय दिवाड संत ज्ञानेश्वर विद्यालय आणि आढले कर्मवीर विद्यालयातील विद्यार्थिनींना या सॅनिटरी पॅडचे वाटप संस्थापक अध्यक्ष संदीप पानसरे , सोनबा गोपाळे गुरुजी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिखारे कार्याध्यक्ष रमेश आरगडे प्रवीण हुलावळे मनोहर खुणे मुख्याध्यापक शशिकांत जाधव प्रभारी मुख्याध्यापिका सौ मुल्ला व सुतार सर या कार्यक्रमांना उपस्थित होते.
सहयोग फाउंडेशन व मावळ तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळ शिखरे व राजेश गायकवाड तसेच सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप पानसरे व स्वभाव गोपाळे गुरुजी यांनी केले होते. यावेळी माध्यमिक शाळांमधील सर्व विद्यार्थिनींना आरोग्यविषयक माहिती यावेळी सांगण्यात आली.