अशी असणार ही नूतन इमारत
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे शहरात नगरपरिषद नूतन इमारत उभी रहात आहे. ही इमारत शहराचे वैभव वाढवणारी आहे. आ. सुनील शेळके यांनी नुकतीच शहरातील विविध विकास कामांची माहिती घेतली. त्याच वेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करताना नव्या इमारतीत राहिलेली कामे जलद गतीने पूर्ण करावीत अशा सूचना आमदार शेळके यांनी नगरपरिषद प्रशासानाला दिली आहे.
नगरपरिषद कार्यलय इमारतीचे बांधकाम 2022 मध्ये सुरु करण्यात आले होते. आता बांधकाम अंतिम टप्प्यात असून त्यातील अंतर्गत सजावट विदयुतीकारण अग्निशमन यंत्रणा सीमाभिंत उद्यान आदी कामे सुरु असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नगर परिषदेचे मुख्यधिकारी विजयकुमार सरनाईक, बांधकाम विभाग अभियंता राम सरगर, पाणीपुरवठा विभाग अभियंता अभिषेक शिंदे, नगर रचना विभाग अभियंता गणेश कोकाटे, तळेगाव शहर भाजप अध्यक्ष संतोष दाभाडे, माजी नगर सेवक सुरेश दाभाडे, ऍड. विनय दाभाडे आदी उपस्थित होते.