तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
नुकतेच विरंगुळा केंद्रात उत्साहात संपन्न झाला. प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ यश हॉस्पिटलचे डॉ. हेमंत अगरवाल, लायंस क्लब ऑफ लोणावळा,लिजंडस आणि जेष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
जेष्ठ समाज सेवक धीरुभाई कल्यानजी,डॉ हेमंत अगरवाल, राजेश मेहता, श्रीधर पुजारी, अमित अगरवाल, एम एन न्युजचे मुख्य संपादक संजय पाटील आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचें उदघाटन करण्यात आले. जेष्ठ नागरिक संघाच्या प्रार्थनेने आरोग्य तपासणी शिबिराला सुरूवात झाली.
यां वेळी वजन, ब्लड शुगर, बी पी, पल्स रेट, बोन डेंसिटी इतर तपासण्या करण्यात आल्या. ६२ लोकांनी याचा लाभ घेतला, डॉ. हेमंत अगरवाल यांनी जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना एक वर्षा साठी मित्र कार्ड दिले ज्या मुळे एक वर्ष सवलतीच्या दरात उपचार मिळणार आहेत.
या कार्यक्रमा नंतर जेष्ठ नागरिकांनी घरून एकत्र जेवणाचा आनंद घेतला, चर्चा केली. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखें, गोरख चौधरी, मृदुला पाटील, संध्या गव्हले, रश्मी शिरस्कर,सुनील पानगावकर , ज्योती रांगणे, शारदा अगरवाल, सत्यनारायण अगरवाल आणि संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.