तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त जेष्ठ कर्मचारी अनिल इंगळे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लिपिक प्रविण माने, रोहित भोसले, चंद्रशेखर खंते, रुपेश देशमुख, निरंजन भेगडे, ताहीर मोमीन आणि संतोष दाभाडे उपस्थित होते.