तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
अनेक वर्ष बंद असलेल्या खंडाळा तलाव येथील बोटींग नुकतीच लोणावळा नगरपरिषदेच्या खंडाळा तलावामध्ये सुरू झालेल्या बोटिंग क्लबचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोटिंग सुरु झाल्याने पर्यटक पर्वणी आणि स्थानिकांना यामुळे चांगला रोजगार मिळणार असल्याचे सुरेखा जाधव यांनी सांगितले.राहिलेले कामं देखील लवकरच पूर्ण व्हावीत आणि स्थानिकांनी यात आपला सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.
खंडाळा तलाव सुशोभीकरण साठी साडेसहा कोटींचा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. अजून बरीच कामे बाकी आहेत ती देखील लवकर पूर्ण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचे असल्याच मत सुरेखा जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे,माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी उपनगराध्यक्ष राजू बच्चे,माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास बडेकर, माजी नगरसेविका पूजा गायकवाड, माजी नगरसेविका रचना सिनकर,माजी नगरसेवक जीवन गायकवाड, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, आशिष बुटाला, माजी शिक्षण मंडळ सभापती साहेबराव टकले, संतोष कचरे पाटील, बोटिंग क्लबचे ठेकेदार नागेश दाभाडे, उद्योजक धनंजय जांभुळकर, पार्वती रावळ, सुमित गायकवाड, लोणावळा नगर परिषदेचे बांधकाम अभियंता साठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.