तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
लोणावळा कॉलेजमध्ये, शनिवार दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी सन १९८८ ते १९९३ या वर्षातील माजी विद्यार्थी स्नेहमेळावा माजी विद्यार्थी संघाने आयोजित केला होता. स्नेहमेळाव्यास १०० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.
५० ते ६० या वयोगटातील, शारीरिक आकारमान बदललेले सर्व विद्यार्थी मेळाव्यात एकमेकांना भेटून हरखून गेले होते.वर्गमित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.
सायं.४ वा शाळेत माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांनी नाश्ता व चहाचा आस्वाद घेताना कॉलेजमधील मस्ती, कॅन्टीनमधील धमाल गोष्टी, केलेला अभ्यास, कॉलेज मधील क्रीडास्पर्धा, स्नेहसंमेलने ,NSS शिबीरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम या विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात कॉलेजचे विश्वस्त श्री.दत्ता भाऊ येवले तसेच कॉलेजचे प्राचार्य श्री.नरेंद देशमुख यांच्या शुभहस्ते सरस्वतीपूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थीनी मालती पैलकर यांनी प्रास्ताविक सादर केल्यानंतर दिवंगत माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.विद्यार्थी मनोगतामध्ये लोणावळा कॉलेजमधील जुन्या सुवर्ण क्षणांना उजाळा देण्यात आला. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे. अविस्मरणीय आहे. असे विचार व्यक्त केले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर विद्यालयातील माजी विद्यार्थी सुनिल कोपरकर व प्रवीण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरेल मंत्रमुग्ध गायन करून मेळाव्याचा माहोल तयार केला.
शेवटच्या सत्रात सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी गेम्स मुख्याध्यापक श्री.बलकवडे सर यांनी घेतले. या खेळात उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यानी आपले वयोमान, पद, प्रतिष्ठा इत्यादी विसरून खेळाचा मनसोक्त आनंद लुटला.या खेळात अनुक्रमे निशा नाईक , महेश पवार, व राजेश परदेशी हे या खेळाचे अंतिम विजेते ठरले. योगाचार्य श्री. अरुण येवले यांनी सर्व उपस्थितांसाठी लाफ्टर शो घेतला. व वातावरण हास्यमय करून टाकले. सदर मैफलीच्या वेळी सर्वांनी उत्तम स्नेहभोजनाचा आनंद लुटला. तब्बल ५ तास कार्यक्रम नियोजनबद्ध चालला. तोही कुठलेही गालबोट न लागता व तेवढ्याच उत्साहात.
यावेळी माजी विद्यार्थी श्री. बाळकृष्ण बलकवडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन केले. तर गोविंद खंडेलवाल यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी बॉबी बनकर, मालती पैलकर , बाळकृष्ण बलकवडे, गोविंद खंडेलवाल, दिपक चौधरी, महेंद्र भालेराव, स्मिता मोडक, अन्नपूर्णा देशपांडे, राणी काळे, संगिता तोडकर,प्रकाश रत्नाकर, घननीळ केळकर, रमेश ढोरे, सुनिल कोपरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सुंदर नियोजन व विविधांगी कार्यक्रमांचे सर्व उपस्थितांनी आयोजकांचे आभार मानले.