तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील पारंपरिक इंद्रायणी तांदूळ शेतीतून केवळ कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या घरात जन्मलेले प्रवीण यांचे वडील भात शेती आणि तांदूळ विक्रीचा व्यवसाय करत होते. मात्र, अत्यंत मेहनत करूनही त्यातून मिळणारे उत्पन्न पुरेसे नव्हते. प्रत्येक वर्षी भात काढणी, कांडप आणि विक्री प्रक्रियेतून मिळणारे अपुऱ्या उत्पन्नाचे सत्र त्यांना खूप काळ सोसावे लागले.
प्रवीण यांना या परिस्थितीचे गांभीर्य समजून आले, स्वतः च्या शेतातील तांदूळ आणि त्यांनी पारंपरिक तांदळाच्या विक्रीला आधुनिकतेची जोड देण्याचे ठरवले. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या प्रवीण यांनी 2021 साली आपल्या नोकरीसोबत तांदूळ विक्रीचा जोडव्यवसाय म्हणून सुरुवात केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण तांदळाच्या उच्च दर्जामुळे आणि मार्केटिंगच्या प्रभावी तंत्रामुळे त्यांचा व्यवसाय हळूहळू स्थिरावत गेला.
प्रवीण यांनी त्यांच्या घरच्या तांदळाच्या विक्रीची सुरुवात 20 बॅग 30 किलोग्राम इंद्रायणी तांदळाने केली, परंतु यश मिळवायला तीन महिने लागले. तरीही त्यांनी माघार न घेता, व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्धार केला. दोन वर्षांतच त्यांचा व्यवसाय स्थिरावला आणि त्यांनी पूर्णवेळ व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पत्नीनेही या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने, त्यांनी अधिक जोमाने व्यवसायास सुरुवात केली.
आज, प्रवीण यांच्या ‘कृषिजन्य’ या ब्रँडने मावळ तालुक्यातील अस्सल पॉलिश इंद्रायणी तांदूळ, हातसडी इंद्रायणी तांदूळ, मावळ शेतकरी आंबेमोहर तांदूळ, आणि खपली गहू यांसारख्या 100% सेंद्रिय उत्पादनांची महाराष्ट्र आणि भारतभर विक्री केली जाते. आज त्यांचे उत्पादन 80 टन आहे. व्यवसायाची सुरूवात 6 क्विंटल तांदूळ विक्रीने झाली आणि आता त्यांनी 80 लाख रुपयांच्या वार्षिक विक्रीत वाढ केली आहे.
‘कृषिजन्य’ या ब्रँडने Google वर 4.9 रेटिंगसह 1300 + रिव्ह्यू मिळवले आहेत, आणि 6000+ ग्राहक भारतभर जोडले गेले आहेत.
त्यांच्या व्यवसायातील प्रामाणिकपणा, गुणवत्ता, आणि सातत्यामुळे ‘कृषिजन्य’ हा ब्रँड आज लोकांच्या घराघरात पोहचला आहे. भविष्यात, प्रवीण घारे यांचे ध्येय आहे की ‘कृषिजन्य’ या ब्रँडने संपूर्ण भारतभर आपले स्थान मिळवावे, आणि इंद्रायणी तांदूळाचा सुगंध प्रत्येकाच्या जेवणात पोहचवावा.
संपर्क: इंद्रायणी तांदूळ मावळ पुणे
मोबाईल: 9823417542