तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे 5 जानेवारी रोजी भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले आहे. या भव्य रक्तदान महायज्ञ तळेगाव स्टेशन येथील हनुमान मंदिर येथे सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यात सिकलसेल, अनेमिया, हिमोफिलिया, रक्त, कॅन्सर अशा गंभीर आजार वाढत असून अशा रुग्णांना रक्ताची आवश्यकताा असते म्हणून संप्रादयामार्फत शासनाच्या रक्तपेढीना रक्ताच्या बाटल्या पुरवण्याचे ठरवले आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संप्रादयाच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमात नाव नोंदणी साठी खालील क्रमांकवर आपले नाव नोंदवू शकतात. यासाठी गणेश कोळेकर. 8888862822, अरुण चोरगे 9552184055 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.