कलापिनीत दिमाखदार वर्षांत २०२४ महोत्सव संपन्न
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
कला संस्कृतीच्या संगमावर, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कलापिनी सांस्कृतिक केंद्रात जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य दिमाखदार वर्षांत महोत्सव संपन्न झाला. कलापिनी आणि मा. आ. कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षांत महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवाचे हे २७ वे वर्ष होते. पुणे, पिंपरी चिंचवड, निगडी, वडगाव, इंदोरी, तळेगाव येथील जवळपास ५५० कलाकार कार्यक्रमात सहभागी झाले होते. अगदी ४ वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत कलाकारांचा सहभाग होता. प्रेक्षकांच्या उत्साही प्रतिसादात एक आगळा वेगळा सोहळा संपन्न झाला.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रसिद्ध उद्योजक हरिश्चंद्र गडसिंग, मंगल गडसिंग, उद्योजक राजेश म्हस्के, राजश्री म्हस्के, कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, उपाध्यक्ष अशोक बकरे, खजिनदार श्रीशैल गद्रे, चेतन शहा, कार्यक्रम प्रमुख हेमंत झेंडे, पुरस्कारार्थी संगीता लाखे, हर्षल पंडित, प्रसाद जवादे, अमृता जवादे, रेश्मा दळवी आणि कलापिनीचे कार्यकारिणी सदस्य हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात लोकंकलावंत संगीता लाखे, सामाजिक कार्यकर्ते हर्षल पंडित, अभिनेता प्रसाद जवादे यांना वर्षांत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेश्मा दळवी – वर्पे यांना वर्षांत सितारा या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. बाळा भेगडे यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते कलापिनी कलादर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कलापिनीची प्रायोगिक नाट्य चळवळ रंगवर्धनचा सदस्य नोंदणी शुभारंभ झाला. रेल्वेचा विशेष पुरस्कार मिळाल्याबद्द्द्ल मिलिंद खडक्कर यांचा गौरव करण्यात आला.
बाळा भेगडे यांनी बालचमुंना मार्गदर्शन केले. गडसिंग यांनी ३१ डिसेंबर चे औचित्य साधून अनेक वर्ष करत असलेल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक केले. राजेश म्हस्के यांनी उपस्थित संघाच्या सादरीकरणाचे कौतुक केले. संगीता लाखे आणि हर्षल पंडित यांनी पुरस्कारा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रसाद जवादे यांनी बालकलाकारांना स्वप्न बघण्यास आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांविषयी सांगितले. तसेच कलापिनी मधील शिबिरे, विविध उपक्रम यामुळे मी घडलो. पालकांना त्यांनी कलापिनीच्या विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या पाल्यांना सहभागी करावे असे आवाहन केले.
गणेश वंदेनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आदर्श विद्या मंदिर, अनन्या झा स्पार्कलिंग स्टार्स, समीर महाजन यांची ताल तरंग, कलापिनी बालभवन, रेश्मा दळवी यांची नवं क्षितिज. डान्स मेनिया, प्रगती विद्यामंदिर – इंदुरी, कलापिनी कुमार भवन, जय वकील स्कूल या संघांनी रसिकांची मने जिंकली. आर के स्टुडिओ – दापोडी, कलापिनी स्वास्थ्य योग, डान्स मेनिया यांनी बहारदार नृत्ये सादर केली. स्केटिंग, धनश्री यांची पंचकोष योग शाळा, मंगेश डान्स अकॅडमी, संदीप कुंजीर यांची शौलीन ट्रॅडिशनल कुंग फु, अवंती – स्वरा ग्रुप, कलापिनी महिला मंच यांच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांनी रंगत वाढवली. अविनाश – अमृता, विनायक लिमये यांच्या नादब्रह्म संगीतालय, कराओके क्लब तळेगाव दाभाडेच्या वरदा मातापूरकर आणि कौस्तुभ ठोसर यांनी सुमधुर गीते सादर केली. नवनाथ नाणेकर यांचे भैरवनाथ भजनी मंडळ, आदर्श विद्या मंदिर – मोठा गट, रवींद्र वाघ यांची ओ एस के मार्शल आर्ट, मंगळागौरीचे खेळ, मल्लखांब, लॅटिस ग्रुप, राकेश शिंदे यांची आर के फिटनेस, मेहेर खान आणि निकिता जाधव यांचा फॅशन शो, नटराज डान्स स्टुडिओ, किरण अडागळे यांची मर्दानी खेळ असोसिएशन या कार्यक्रमांनी रसिकांची वाहवा मिळवली. टीम डान्स मेनिया – महिला, हेमंत पानसरे यांचा आर्ट एवोल्युशन डान्स ग्रुप, निकिता जाधव अॅकॅडमी, राहुल देठे यांची स्टेप हार्ड डान्स अॅकॅडमी यांच्या वतीने बहारदार नृत्य सादर करण्यात आली. संदीप, अविनाश आणि विपुल यांच्या दिलखेचक नृत्यानी कार्यक्रमाचा समारोप केला.
अविनाश शिंदे, अमृता झा आणि सोनाली पडळकर यांनी रंगतदार सूत्रसंचालन केले. सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. विनया केसकर यांनी केले. अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी स्वागत केले.डॉ अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले. विपुल परदेशी, चेतन पंडित, दिपाशु सिंग, संदीप मानकर, ऋषिकेश कठाडे, साहिल जोशी, आदित्य सावंत, आर्या देशपांडे, अर्णव धुलगुडे, राकेश मोने यांनी संयोजन केले. साहिल जोशी, आदित्य सावंत यांनी संगीताची बाजू सांभाळली. कलापिनी महिला मंच आणि अन्य कार्यक्रर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. किशोर कसाबी यांनी बैठक व्यवस्था सांभाळली. हितेश शिंदे यांनी छाया चित्रण तर सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनी संयोजन केले.