तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगरपरिषदे तर्फे पतंग महोत्सव आयोजित केला. या मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध आकाराचे पतंग श्री. रमेश पार्टे व श्री. श्रीकांत चेपे, गौरव चेपे यांनी उडवून दाखविली.
स्थानिकांनी, शालेय विद्यार्थ्यांनी याचा मनमुराद भरपूर आनंद घेतला. त. दा. न. परिषदेचे मुख्याधिकारी श्री . विजयकुमार सरनाईक सर उप मुख्याधिकारी सौ ममता राठोड तसेच नगरपरिषदेचे अधिकारी , कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी मुलांना पतंग व दोरा मोफत वाटण्यात आले.