तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा तळेगाव दाभाडे (मावळ) आणि साप्ताहिक अंबर यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुका साहित्यिक व कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील साहित्यिक व कलाकारांना एकत्र करून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच शासनाच्या विविध योजना कलाकारांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता रिक्रिएशन हॉल, तळेगाव जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे (स्टेशन) या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आमदार मा सुनील शेळके तर प्रमुख पाहुणे मा भाऊसाहेब भोईर (उपाध्यक्ष – अ भा. म. ना. प मध्यवर्ती शाखा, मुंबई), लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर, मेघराज राजेभोसले (अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ), बाबा पाटील (साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग, प्रांतिक अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र राज्य), कौस्तुभ कुलकर्णी (सदस्य- साहित्य वृद्ध कलावंत मानधन समिती, पुणे जिल्हा), गणेश खांडगे (अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस, मावळ तालुका), संतोष दाभाडे (शहराध्यक्ष- भाजप तळेगाव दाभाडे), कृष्णा कारके (मा. नगराध्यक्ष, त. दा. न. प.) गणेश काकड़े मा नगराध्यक्ष तळेगाव दाभाड़े उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यासाठी मावळ तालुक्यातील साहित्यिक व सिनेमा, नाट्य, नृत्य, वादन, गायन, भारुड, भजन, निवेदन, विविध लोककला अशा सर्वच कला क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञानी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे अध्यक्ष सुरेश धोत्रे आणि सा. अंबर चे संपादक सुरेश साखवळकर यांनी केले आहे.