Spread the love

तळेगाव दाभाडे‌ : प्रतिनिधी

अखिल भारतीय नाट्य परिषद मावळ शाखा आणि साप्ताहिक अंबर यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक आणि कलाकार यांचा मेळावा नुकताच तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल मधील कॉन्वलसंट हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती नाट्य परिषद उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मावळ चे आमदार सुनील शेळके, बाबा पाटील कुलकर्णी नाट्य परिषद मावळ शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, अंबरचे सुरेश साखवळकर, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, गणेश खांडगे, गणेश काकडे, भाजप तळेगाव अध्यक्ष दाभाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मावळातील कलाकारांना एकत्रिक करणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील कलाकार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

जेष्ठ कलाकारांना सरकारी मानधन मिळावे आणि त्यांचे पुढील आयुष्य सुसह्य जगता यावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सुरेश धोत्रे यांनी सांगितले तर मावळातील कोणताही कलाकार सुटता कामा नये त्याला मदत मिळवून देण्याची जबाबदारी माझी असल्याचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी यावेळी सांगितले. बाबाजी पाटील यांनी कलाकार यांचे मानधन वाढून द्यावे आणि पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा मिळून संख्या ही १०० ऐवजी २०० ते ३०० करावी अशी मागणी केली. सुरेश धोत्रे आणि साखवळकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *