तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
लोहगड किल्ला आता अतिशय सुंदर झाला आहे. त्या दृष्टीने गडावर विविध कामे झाली आहेत. तरी देखील पर्यटक व शिवप्रेमीसाठी काही गोष्टी अजूनही गैरसोयीच्या आहेत. त्यामध्ये पिण्याचे पाणी हा महत्त्वाचा भाग होता. गडावर पिण्याचे पाणी नसल्यामुळे शिवप्रेमी व पर्यटकांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच यांनी वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा केला होता. यात आता पुरातत्व विभागाने या मागणीची सकारात्मक भूमिका घेऊन लोहगड पायथ्याला पुरातत्व विभागाला साजेस असे ऐतिहासिक पद्धतीने दगडामध्ये सुंदर अशी पाणपोई बांधली आहे. त्यासाठी पुरातत्व अधिकारी गजानन मांढवरे साहेब यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली. तसेच त्या पाणपोईला जी पाण्याची टाकी जोडली आहे. त्या टाकीला लोहगड ग्रामपंचायत ने पाणी पुरवले, अशी माहिती मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिली.
याप्रसंगी सचिन टेकवडे यांनी सांगितले काही वर्षांपूर्वी लोहगड गावाला उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी होती. त्यावेळेस टाटा मोटर्स सुमंत मुळगावकर ट्रस्टतर्फे ग्रामस्थांना दहा लाख रुपयांची विहीर बांधून दिली होती. त्यावेळेस ग्रामस्थांची पाण्याची तात्पुरती गरज भागली होती. आज ग्रामस्थांना पवनेचे पाणी मिळत आहे .ग्रामस्थांनी त्यांना मिळणाऱ्या पाण्यातून पर्यटकांसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली चांगल्या सहकाराची भावना दाखवली त्यामुळे मंचातर्फे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, मार्गदर्शक संदीप गाडे ,अनिकेत आंबेकर ,सचिन निंबाळकर, चेतन जोशी ,अजय मयेकर, बसाप्पा भंडारी,गणेश उंडे, अमोल गोरे यांनी पुरातत्व विभाग व लोहगड ग्रामस्थ यांचे आभार मानले.
अजूनही एक महत्त्वाची सुविधा म्हणजे गड पायथ्याला व गडावर टॉयलेट असणे आवश्यक आहे पर्यटकांच्या दृष्टीने ही मोठी गैरसोय आहे विशेषता महिलांच्या दृष्टीने ही अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संस्थापक सचिन टेकवडे यांनी केली.