तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
SRCC मुंबई व रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने आयोजित लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर काल दि १९ जानेवारी २०२५ रोजी यशस्वी रित्या संपन्न झाले.
SRCC च्या संचालिका डॉ शिवांगी पुरंदरे यांच्या पुढाकाराने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
प्रियदर्शनी संकूल,गावठाण लोणावळा, येथील शिवदुर्ग मित्रच्या हॉलमध्ये या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात मुंबई हून आलेल्या SRCC च्या प्रत्येक गोष्टीमधील तज्ञ डॉक्टरांकडून लहान मुलांच्या बाबतीतील पुढील लक्षणांची तपासणी करून पुढील उपचार सुचवले.
चालण्यात असंतूलन, अवयवांचे विकार, स्नायुंचे विकार, हाडांना झालेली दुखापत, सेरेबल पाल्सी, पाठीच्या कण्याचे विकार, स्वमग्नता, अतिचंचलता, फिट / झटके येणे, शुद्ध हरपणे, स्नायुंचे आखडणे, शिक्षकण्यातील अक्षमता, अनुवांशिक विकार, भौतीक उपचार, स्पीच थेरपी, मानसशास्त्र व वर्तणूक थेरपी, व्हिजन थेरपी.
या शिबिरासाठी शिवदुर्ग मित्र चे श्री सुनिल गायकवाड , आनंद गावडे सर उपाध्यक्ष महेश मसने , राजेंद्र कडू , अनिल सुतार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
रोटरी क्लबचे रो.आशिष मेहता,रो.सौ .ब्रिंदा गणात्रा व रो. जयवंत नलोदे हे उपस्थित होते.
या शिबीरासाठी माजी उपनगराध्यक्ष श्री श्रीधर पुजारी तसेच श्री प्रकाश पाठारे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबीरात ४५ मुलांची तपासणी करून पुढील उपाय सुचवण्यात आले.