तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव दाभाडे – मावळ शाखेच्या वतीने या वर्षी मावळ तालुक्यासाठी पै.मोहन महादेव काकडे स्मरणार्थ कै.थोर साहित्यिक गो.नी.दांडेकर करंडक आंतर शालेय बालनाट्य स्पर्धा आयोजीत केल्या आहेत.
या स्पर्धा १ ली ते ४ थी प्राथमिक गट व ५ वी ते १० वी माध्यमिक गट अशा दोन विभागात होणार असून प्राथमिक विभागाच्या स्पर्धा दि.११ फेब्रुवारी २०२५ व माध्यमिक विभागाच्या स्पर्धा दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात होतील या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ दि.१२ फेब्रुवारी २००५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता होईल.
या स्पर्धांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवली असून या.स्पर्धेचे प्रवेश शुल्क रु.१०० मात्र आहे.तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघास प्रवास खर्चासाठी रु.५००/- देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे अर्ज अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव दाभाडे – मावळ शाखेचे कार्यालय शुभम कॉम्प्लेक्स,चाकण रोड,तळेगाव स्टेशन येथे मिळतील.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजे पर्यंत.
या स्पर्धा श्रीरंग कलानिकेतन सभागृह,वनश्री नगर,तळेगाव चाकण रोड येथे होणार असून मावळ तालुक्यातील सर्व शाळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन स्पर्धा प्रमुख नयनाताई डोळस (९९२१३८७३०७), भगवान शिंदे (९८२२७२५४५१) व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव दाभाडे – मावळ शाखेचे अध्यक्ष सुरेशराव धोत्रे यांनी केले आहे.