Spread the love

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कायदा व सुव्यवस्था चिंताजनक आहे. ज्या राज्यात मंत्री असणारीच लोक जाळपोळ करण्यासाठी रस्त्यावर लोकं उतरवतात. पालकमंत्री पदासाठी राज्यात जाळपोळ होते. अशा राज्याबद्दल आपण जास्त काही न बोलेलं बर आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

जयंत पाटील बोलताना म्हणाल की, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आमची एकत्रित भेट झाली नव्हती. आज आम्ही भेटलो व आमच्यात फक्त जनरल चर्चा झाली. लवकरच महाविकास आघाडीची एकत्रित बैठक लावली जाईल. असे जयंत पाटील म्हणाले.

पुढे जयंत पाटील बोलताना म्हणाल की,राज्यातील कायदा व सुव्यवस्था चिंताजनक आहे. ज्या राज्यात मंत्री असणारीच लोक जाळपोळ करण्यासाठी रस्त्यावर लोकं उतरवतात. पालकमंत्री पदासाठी राज्यात जाळपोळ होते. अशा राज्याबद्दल आपण जास्त काही न बोलेलं बर आहे. पालकमत्री पदावरून आमच्या लाडक्या बहिणीवर अन्याय झाल्याचं पाहायला मिळत आहे असेही जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले.

यावर सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाल की, ठीक आहे. आता 237 च्या पुढे आमदार आहेत, आणखी तिथे गेले तर 288 च्या जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यामध्ये काहीच फरक पडत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात स्फोट होईल असं काही नाही. राज्यातील जनतेला सवय झाली आहे. कोणी कोणत्याही पक्षात गेल्यास महाराष्ट्रातील जनतेनं त्यावर तीव्र आक्षेप घेण्याचं थांबवलेलं दिसतंय. बदलापूर प्रकरणातील शाळेच्या मालकाला वाचवण्यासाठी काही त्रुटी लपवण्याची गरज असेल व हे सर्व अक्षयला माहित असेल त्यामुळे त्याचा इन्काउंटर झाला का? अशी शंका येते. असे जयंत पाटील म्हणाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *