

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पृथ्वीचे सरंक्षण, पर्यावरणपूरक कृतींचा प्रचार व जनजागृती तसेच तळेगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि सुशोभित करण्याच्या हेतूने शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकरिता भिंत रंगविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रम हॅचिंग शाळेच्या परिसरात घेण्यात आला. यावेळी दाभाडे शहरातील 32 शाळेच्या 250 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित नागरिक आणि स्पर्धक यांना माझी वसुंधरा हरित शपथ देणेत आली.
कार्यक्रमाचे औपचारिक स्वागत उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी केले तर रोटरी क्लबचे अध्यक्ष कार्ले यांच्या हस्ते रंगकामाचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे उपाध्यक्ष श्रीशैल मेन्थे, सचिव प्रमोद दाभाडे, सह प्रांतपाल दीपक फल्ले, प्रांत पी आय प्रमुख प्रसाद गणपुले, प्रकल्प प्रमुख शर्मिला शाह, राजू गोडबोले, वेदांग महाजन, प्रसाद मुंगी, यादवेंद्र खळदे, विलास जाधव, वैशाली दाभाडे, निता काळोखे, फर्स्ट लेडी शुभांगी कार्ले, प्रवीण साठे, भालचंद्र लेले, धनंजय मथुरे, राजेंद्र पोळ उपस्थित होते.