

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने परंपरागत साजरा होणारा महाशिवरात्र उत्सव यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भाजे, लोहगड भजनी मंडळ व हभप दिलीप महाराज खेंगरे यांच्या वतीने हरिजागर करण्यात आला. लोहगडावरील महादेव मंदिरात टाटा मोटर्स युनियनचे माजी अध्यक्ष सतीश ढमाले व सरपंच सोनाली ताई बैकर व सोमनाथ बैकर यांच्या वतीने सपत्नीक अभिषेक करण्यात आला. लोहगड गावातून श्री शिवाजी उदय मंडळ लोहगड यांचे वतीने ढोल ताशांच्या गजरात शिवपालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी रांगोळ्या काढून महिलांच्या वतीने शिवप्रभूंच्या पालखीचे औक्षण करण्यात आले. सुंदर फुलांनी व सडा रांगोळी काढून शिवस्मारक सजावट करण्यात आली होती. शिवस्मारक रंगरंगोटीचे सुंदर काम सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण टेकवडे यांच्या वतीने करण्यात आले होते. शिववंदनेने शिवस्मारकावर अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते. शिवघोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमासाठी रायगड मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, प्रकाशराव मिठभाकरे, रुपेश मोरे, अमोल बुडखले ,सामाजिक कार्यकर्ते नितीन बारणे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सोनालीताई बैकर, गणेश धानिवले, रमेश बैकर, राजू शेळके, शत्रुघ्न बैकर, शंकर चिव्हे, पो.पा. सचिन भोरडे, नागेश मरगळे, गणपत ढाकोळ, रमेश बैकर, पोपट दिघे, बाळू ढाकोळ, तुकाराम बैकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी ग्राम. सदस्या काजल ढाकोळ, स्वाती मरगळे, स्नेहल बैकर, नंदाताई बैंकर ,ज्योती धानिवले आदी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिवभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था उद्योजक चंद्रकांत भन्साळी यांच्या वतीने करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे नियोजन सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, घनश्याम लोणकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, चेतन जोशी, सचिन निंबाळकर, अमोल गोरे, गणेश उंडे, बसप्पा भंडारी, गणेश भोसले, सोमनाथ बैकर, महेंद्र बैकर, संदीप बैकर, शिवतेज शेंडे, मच्छिन्द्र वाघमारे, राहुल वाघमारे, आकाश बैकर, मंगेश रावणे, ग्राम. सदस्य महेश शेळके, अभिषेक बैकर, पंढरीनाथ विखार, आदी कार्यकर्त्यांनी केले होते.
नुकतेच, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगड किल्ल्याला नामांकन प्राप्त झाले आहे. मंच, लोहगड घेरेवाडी ग्रामस्थ व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संघटित प्रयत्नातून आज दिमाखात पुन्हा कात टाकून उभा राहिलेला लोहगड आपणास पहायला मिळतो. मुख्य द्वाराला बसविलेला भक्कम सागवानी दरवाजा हा महाराष्ट्रातील पहिला किल्ला म्हणून हा मान लोहगडाला जातो. पुढे मंचाच्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले आणि शिवकालीन प्रथेनुसार गडाचे दरवाजे दररोज संध्याकाळी बंद झाल्यामुळे गडावरील अनुचित प्रकारांना आळा बसला. मंच आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. लोहगडाच्या पायथ्याला भव्य शिवस्मारक उभे राहिले. मंचाच्या पाठपुराव्यामुळे लोहगडाचे तटबंदी, बुरुज, पायऱ्या, दिशादर्शक फलक इत्यादी दुर्गसंवर्धनाची कामे भारतीय पुरातत्व विभागामार्फत पूर्ण करण्यात आली.
मंचाच्या पुढाकाराने ग्रामस्थांचे सहकार्याने लोहगड पायथ्याला शिवस्मारक उभारण्यात आलेले आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शिवकार्याची प्रेरणा मिळते. या शिवस्मारक परिसरामध्ये साजेशी भव्य शिवसृष्टी साकार व्हावी अशी तमाम शिवभक्तांची इच्छा असल्याची भावना याप्रसंगी सचिन टेकवडे यांनी व्यक्त केली.