


पिंपरी चिंचवड भाजप संघटन पर्वात १४ मंडल अध्यक्षांची केली निवड
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संघटनेच्या नवीन पर्वात १४ मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील भाजप संघटनेला नवी ऊर्जा मिळाली असून, शहरात पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.
चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील १४ मंडलांसाठी नवीन अध्यक्षांची निवड रविवारी जाहीर करण्यात आली आहे. आमदार शंकर जगताप यांनी विधानसभा निहाय आयोजित कार्यक्रमांमध्ये नवनियुक्त मंडल अध्यक्षांची नावे जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले. प्राथमिक सदस्य, सक्रिय सदस्य, बूथ कमिटी यानंतर संघटन पर्वाच्या तिसऱ्या टप्प्यात मंडल अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.
* चिंचवड विधानसभा मतदारसंघ:*
* मोहन राऊत (रावेत – वाल्हेकरवाडी)
* हर्षद नढे (चिंचवड-काळेवाडी)
* सनी बारणे (थेरगाव – वाकड)
* सोमनाथ तापकीर (रहाटणी – पिंपळे सौदागर)
* गणेश ढोरे (सांगवी – पिंपळे गुरव)
* पिंपरी विधानसभा मतदारसंघ:
* जयदीप खापरे (प्राधिकरण – चिंचवड)
* धरम वाघमारे (आकुर्डी गाव- शाहूनगर)
* मंगेश धाडगे (संत तुकाराम नगर – खराळवाडी – कासारवाडी)
* अनिता वाळुंजकर (फुगेवाडी-दापोडी-बोपखेल)
* भोसरी विधानसभा मतदारसंघ:
* ऍड. योगेश सोनवणे (चिखली – कृष्णानगर)
* रामदास कुटे (तळवडे – यमुनानगर)
* अजित बुर्डे (मोशी – चऱ्होली)
* अमोल डोळस (दिघी – गवळीनगर – गव्हाणे वस्ती)
* शिवराज सुदाम लांडगे (धावडे वस्ती – इंद्रायणीनगर – नेहरूनगर) यांची मंडल अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, शितल शिंदे, शैलाताई मोळक, माजी महापौर नितीन काळजे,
दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, मोरेश्वर शेडगे, संतोष कलाटे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, बाबासाहेब त्रिभुवन, शेखर चिंचवडे, सोमनाथ भोंडवे, संदीप नखाते, प्रसाद कस्पटे, बिभीषण चौधरी, दीपक भोंडवे, संकेत चोंधे, राजेंद्र बाबर, निलेश अष्टेकर, कैलास सानप, विजय शिनकर, नंदू भोगले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला या निवडीमुळे एक नवीन दिशा मिळेल, तसेच, नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल आणि जनतेच्या समस्यांवर अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी आशा भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली.