


तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
अत्याधुनिक कॅन्सर स्क्रीनिंग युनिटसह सुसज्ज अशा टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरने नुकतीच मोबाईल ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन सुरू केली आहे. या माध्यमातून स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणी केली जाणार आहे. ही मोबाईल व्हॅन रोटरी क्लब ऑफ तळेगाव, दाभाडे द्वारे यांचे सहकार्य लाभले असून आहे आणि पॉस्को इंडियाने याकरिता आर्थिक मदत केली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि निम-शहरी भागातील महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच लवकर निदान करता यावे आणि त्याबाबत पुरेशी जागरुकता निर्माण करण्यासाठी या ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही व्हॅन मोठ्या कार्यालयांना आणि उद्योगांना भेट देऊन अशा वंचित कामगारांपर्यंत पोहोचेल जे अनेकदा प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीस टाळाटाळ अथवा विलंब करतात.
ही व्हॅन पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुणे शहर, पुरंदर, शिरूर, वेल्हे अशा गावांमध्ये उपलब्ध राहिल. ही व्हॅन स्तनाच्या कर्करोगासाठी थर्मल स्क्रीनिंग, गर्भाशयाच्या कर्करोगासाठी पॅप स्मीअर/व्हीआयए, विविध कर्करोगांसाठी रक्त चाचण्या आणि मौखिक तपासणीसह मोफत कर्करोग तपासणी प्रदान करते. थर्मल स्क्रीनिंगद्वारे जर काही असामान्यता आढळली तर रुग्णांना रुग्णालयात मॅमोग्राम किंवा सोनोग्रामचा सल्ला दिला जाईल.
या व्हॅनच्या शुभारंभ प्रसंगी दरम्यान व्यवस्थापकीय संचालक सुंग वूक चोई, संचालक युनचियोल ली, पबित्रा स्वेन (अध्यक्ष २०२४-२०२५), नेहा वाघचौरे, सेवानिवृत्त कमलेश कार्ले, डॉ. नेहा कुलकर्णी(संचालक- वैद्यकिय) सेवानिवृत्त प्रमोद दाभाडे(सचिव), सेवानिवृत्त श्रीशैल मेंथे(उपाध्यक्ष) आणि सचिन देशमुख(व्यवस्थापकीय संचालक ऑन्को लाईफ हॉस्पिटल).
स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये कर्करोगाच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक ठरत आहे, तरीही अनेकांना त्याबद्दल फारशी माहिती नसल्याचे पहायला मिळते. नव्याने सुरु केलेली केलेली ही व्हॅन थर्मॅलाइटिक्सचा वापर करते व यामध्ये प्रगत एआय-तंत्रज्ञानावर आधारित, रेडिएशन-मुक्त स्तन तपासणी केली जात असून ते वेदनारहित आणि गोपनीयतेसाठी अनुकूल आहे. ४० वर्षांखालील महिलांसह सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी हे सुरक्षित तसेच वेळीच असामान्य लक्षणे शोधण्यास मदत करते. याठिकाणी केल्या जाणाऱ्या चाचणीचा निकाल फक्त दोन मिनिटांत तयार होतो आणि ते व्हॉट्सअॅप, ईमेल किंवा प्रिंटद्वारे शेअर केले जाऊ शकतो, ज्यामुळे ही संपुर्ण प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभरित्या पार पडते. निदानानंतर वेळीच उपचार करून एखाद्याचा अमुल्य जीव वाचविता येऊ शकतो. पॉस्को इंडिया या उपक्रमात महत्त्वाचा वाटा आहे.
ऑन्को लाईफ हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सचिन देशमुख सांगतात की, महिलांना रुग्णालयात न जाता पूर्णपणे सुरक्षित, खाजगी आणि अचूक तपासणी करण्यासाठी या मोबाईल व्हॅनचा नक्कीच फायदा होईल. एमजेपीवाय, पीएमजेएवाय, इसीएचएस आणि एमपीकेएवायसारख्या सरकारी योजनांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोफत तपासणी आणि मार्गदर्शन हे आमचे मुख्य ध्येय आहे. गरजूंना आम्ही आर्थिक मदत आणि सवलतीच्या दरात उपचार देखील पुरवत आहोत.
पोस्को इंडिया लिमिटेडच्या सीएसआर निधीच्या सहकार्यातून शक्य झालेली ही कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन उपलब्ध करुन देताना रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि सन्मानाची बाब आहे. हे मोबाईल युनिट पुणे जिल्ह्यातील वंचित आणि गरजू व्यक्तींना सेवा देण्यासाठी कार्यरत राहिल, ज्यामध्ये ग्रामीण भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कर्करोगाचे वेळीच निदान करणे अत्यंत गरजेचे आहे आणि ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना जीवनरक्षक स्क्रीनिंग सेवा पुरविणे हे या उपक्रमाचे मुळ उद्दिष्ट्य आहे, अशी प्रतिक्रिया रोटरी क्लब ऑफ तळेगाव, दाभाडेचे अध्यक्ष (२०२४-२०२५) कमलेश कार्ले यांनी स्पष्ट केले.