
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आवाहन
पुणे : प्रतिनिधी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांशी संबंधित वाहन चालकांनी १९ जुन २०२५ पर्यंत तांत्रिक तपासणी करून घेण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
परिवहन कार्यालयाचे आळंदी रोड चाचणी मैदान व दिघी येथील टेस्ट ट्रक मैदान येथे कार्यालयीन वेळेत वाहनांची तांत्रिक तपासणी करून घ्यावी. वाहन तपासणी वेळी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र. कर विमा प्रमाणपत्र. योग्यता प्रमाणपत्र व वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र( पियूसी) अनुज्ञप्ती. व वाहतूक परवाना मुदतीत असल्याबाबतचे सर्व कागदपत्रे सोबत घेऊन यावे. ही तांत्रिक तपासणी विनामूल्य असून वाहन तपासणी केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. देहू आळंदी पंढरपूर या पालखी मार्गावर पालखी सोहळ्यातील जड वाहने मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. त्या वाहनांमध्ये तांत्रिक दोष राहता कामा नये यासाठी उपाययोजना म्हणून पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. तरी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहन चालकांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
About The Author

