
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
येथील इद्रांयणी विदया मंदिर संचलित इंद्रायणी महाविद्यालयात जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी ही प्रशिक्षण संस्था आपल्या माध्यमातून तळेगाव दाभाडे परिसर आणि मावळ तालुक्यातील युपीएसी व एमपीएसी व इतर स्पर्धा परीक्षा यांसाठी असलेली पूर्वतयारी व मार्गदर्शन वर्ग आयोजित करीत आहे.
या मार्गदर्शन वर्गात केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी तसेच बँकिग पर्सनल सिलेक्शन, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे रिक्रुटमेंट यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या तयारीसाठी क्लासेस सुरू करण्यात येणार आहेत. प्रति आठवडयाला विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातील आणि विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क परीक्षा इंटिग्रेटेड बॅच हा या अकॅडमीचा महत्त्वाचा उपक्रम असून, सर्व विषयांचे सखोल मार्गदर्शन, परीक्षाभिमुख दृष्टीकोन, दर्जेदार व अद्ययावत अभ्यास साहित्य आणि भरपूर सराव हे या अभ्यास वर्गाचे वैशिष्टय आहेत. इंद्रायणी महाविद्यालयात आधुनिक डिजीटल सुविधांनी सुसज्ज क्लासरूम, कॉम्प्युटर लॅब, संदर्भ ग्रंथ आणि नियकालिकांनी परिपूर्ण वाचनालय उपलब्ध केलेले आहे.
या अकॅडमीला इंद्रायणी महाविद्यालयाचे अनुभवी प्राध्यापक वर्गाचे तसेच संस्थेचे पदाधिकारी, संस्थापक अध्यक्ष रामदासजी काकडे, सेक्रटरी चंद्रकांत शेटे यांचे पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.
युपीएससी व एमपीएसी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या व शासकीय अधिकारी होण्याची जिद्द व महत्त्वांकाक्षा असलेल्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गात प्रवेश घ्यावा, असे आवाहन सुधीर राऊत, संचालक जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी, तसेच इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले आहे.
About The Author
