
तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे ४जणांचा मृत्यू झाला व ५१ नागरिक जखमी झाले आहेत.
यावेळी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष व पदाधिकऱ्यानी तळेगाव येथील अथर्व हॉस्पिटलात जखमी नागरिकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना धीर दिला. त्यांना सर्वोतपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.रुग्णाच्या नातेवाइकांची जेवणाची चांगली व्यवस्था केली. तसेच काहीही मदत लागल्यास त्वरीत मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी या ठिकाणी नायब तहसीलदार गणेश तळेकर, तहसीलदार विक्रम देशमुख, मा. नितिन ओव्हाळ तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी व युवा अध्यक्ष मा. संदीप कदम तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
About The Author
