
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संग्रामभाऊ जगताप मित्र परिवार आणि आमदार सुनील अण्णा शेळके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य मोफत सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझे गाव माझी जबाबदारी’ या संकल्पनेखाली हे शिबिर येत्या शनिवारी, २२ जून २०२५ रोजी तळेगाव दाभाडे येथे जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन शासकीय योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक नागरिक ८३८००२६३०० या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकतात. थील हॉटेल ड्रीम लँड हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
या महत्त्वपूर्ण शिबिरास प्रसिद्ध सिनेअभिनेते मोहन खांबेटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड, रेशन केवायसी, योजना, इ.श्रम कार्ड, नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती व ट्रान्सफर आदी सुविधा प्राप्त होणार आहेत.
About The Author

