
पुणे पिंपरी : प्रतिनिधी
पुणे येथील संत देवजी बाबा मंदिरासमोर “समतेचा वारकरी, सेवा हिच माझी पंढरी” या उपक्रमांतर्गत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या साधू, संत, वारकरी, भाविक आणि भक्तांसाठी मोफत आरोग्य सेवा आणि इतर सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अन्नछत्राच्या अन्नवाटप उपक्रमाचे उद्घाटन महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष विठ्ठल दादा गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक आणि गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे (माऊली) होते. डॉ. बाबा कांबळे यांनी पुणे ते पंढरपूर या मार्गावर या सेवा राबवल्या जाणार असल्याची माहिती दिली.
या उपक्रमात पुणे ते पंढरपूर या मार्गावर वारकऱ्यांसाठी खालील १२ प्रकारच्या मोफत सेवांचा समावेश होता.
यामध्ये मोफत रिक्षा सेवा, आरोग्य सुविधा, चरण सेवा (पाय मालिश), मोबाईल चार्जिंग सेवा, पाणीपुरवठा (बिसलेरी पाणी), अन्नदान (अन्नधान्य, बिस्किटे), निवास व्यवस्था, स्वच्छता सुविधा, मार्गदर्शन, आपत्कालीन सेवा, सुरक्षा व्यवस्था, माहिती केंद्र आणि विश्रांती स्थळे, सांस्कृतिक कार्यक्रम समावेश करण्यात आला होता.
डॉ. अभिजीत वैद्य यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य सेनेने आरोग्य साहित्य आणि औषधांचे वितरण केले. तसेच, डॉ. अजिज मणियार यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य औषधोपचार केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, संत रोहिदास महाराज दिंडी क्रमांक २४ चे विश्वस्त नारायण महाराज कोकाटे, मारुती धावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम महाराष्ट्र रिक्षा पंचायत, बाबा सामाजिक सोशल फाउंडेशन, रिक्षा ब्रिगेड आणि कष्टकरी कामगार पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराचे अध्यक्ष महम्मद भाई शेख, कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय शिंदे, सचिव अविनाश वाडेकर, सल्लागार कुमार शेट्टी, सचिव विल्सन मस्के, सहसचिव निशांत भोंडवे, पुणे शहर उपाध्यक्ष प्रवीण शिखरे, पुणे शहर संघटक आनंद वायदंडे, अँथोनी फ्रान्सिस अण्णा, मध्यवर्ती पुणे शहराध्यक्ष विजय पाटील, पुणे शहर उपाध्यक्ष संतोष गोसावी, आमिर हामजा, सहखजिनदार मौलाबाई शेख, शहर संघटक अल्लाबक्ष, कोंडवा विभाग अध्यक्ष फिरोज शेनागो, शहर संघटक बाबू झाडवाले, पाषाण सुसरोड अध्यक्ष अशोक टेमघरे, शहर संघटक राजु शेख, येरवडा विभाग उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर, पुणे स्टेशन विभाग अध्यक्ष मल्लेश कांबळे, पुणे स्टेशन अध्यक्ष गणेश कांबळे, पुणे स्टेशन उपाध्यक्ष रमेश इंगळे, पुणे ऑफिस स्टॉप साद खान, पुणे शहर सभासद विजय चव्हाण आणि सभासद प्रमोद जव्हेरी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच, आरोग्य सेनेचे डॉ. अभिजीत वैद्य आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञांनी औषध वितरणासाठी मोलाचे सहकार्य केले.
About The Author

