
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस योगाच्या अनेक फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो, जो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
तळेगाव दाभाडे येथील टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग हा केवळ एक सराव नाही, तर तो एक जीवनशैलीचा भाग असून नियमित योग्याभ्यासाचा सल्ला यावेळी देण्यात आला. यावेळी रुग्णालयाच्या डॉ. ज्योती मेहता, डॉ. संतोष साहू आणि डॉ. प्रिया अग्रवाल उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला १७७ देशांनी पाठिंबा दिला आणि ११ डिसेंबर २०१४ रोजी २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला.
योग हा भारताने जगाला दिलेला एक अनमोल वारसा आहे, जो केवळ व्यायाम नसून एक जीवनशैली आहे. ती शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन साधण्यास मदत
करते.
About The Author
