Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

‘सकल मराठा परिवार वारकरी सेवा’ या उपक्रमा मार्फत देहू आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी सकल मराठा परिवार मावळच्या कार्यकर्त्या दिपाली तांबे यांनी विशेष वैद्यकीय सेवा पुरवली. देहू आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी त्यांनी Paracetamol. Diclfenac. Diclofenac. Cerizin, Antacid या वैद्यकीय गोळ्यांसह प्रथोमोपचार पेटी, इब्रप्रोपिन, मलमपट्टी, डिस्प्लोजेबल हात मोजे, अन्टिझेष्टीक क्रीम, थर्मामीटर, वेदनाशमक गोळ्या आदी वैद्यकीय वस्तूचे वारकऱ्यांना मोफत वाटप केले.

अभिनेता संदीप पाठक हे देखील यावेळी उपस्थित होते. शनिवार (दि. २१) जुन २०२५ रोजी सकाळी पुणे येथील बंदिवान मारुती मंदिर फुल वाला चौक, हिंदू तरुण मंडळ या ठिकाणी सकल मराठा परिवाराचे असंख्य कार्यकर्ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपस्थित होते. या सर्व सेवेचा लाभ अनेक वारकरी भाविकांनी घेतला. या संदर्भात बोलताना सकल मराठा परिवार मावळच्या कार्यकर्त्या दिपाली तांबे म्हणाल्या की, वारी मधील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मला मिळाली. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून वैद्यकीय सेवेसाठी लागणाऱ्या गोष्टी दिल्या आहे. दरवर्षी अशी संधी मला मिळो.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *