
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ तालुका स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात तळेगाव दाभाडे येथील रमाकांत तरुण मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते कुणाल शंकरराव आगळे यांची ‘ राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेल’ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
‘राष्ट्रवादी काँग्रेस ‘सामाजिक न्याय सेल’चे जिल्हाध्यक्ष सुहास बळीराम गरुड यांनी त्यांची निवड केली. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कुणाल आगळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी अध्यक्ष गणेश ढोरे, माजी अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुहास गरुड, नारायण पाळेकर, महादू कालेकर, दीपक हुलावळे,
विकास बढेकर, प्रवीण झेंडे, काळूराम मालपोटे, भरत येवले, पंढरीनाथ ढोरे, संदीप आंद्रे, चंद्रकांत दाभाडे, किशोर सातकर, रुपेश घोजगे, माऊली निंबळे,लाला गोणते आदी उपस्थित होते.
या नियुक्ती संदर्भात बोलताना कुणाल आगळे म्हणाले की, आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
About The Author

