
वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुढाकारानंतर प्रशासनाची दखल
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
कान्हे फाटा (ता. मावळ) येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात (कान्हे फाटा हॉस्पिटल) आवश्यक सुविधा, डॉक्टर, कर्मचारी व यंत्रसामग्रीचा अभाव असल्याचे वास्तव वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप भाऊ कदम यांनी उघड केले आहे. त्यांच्या पुढाकारानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत रुग्णालयातील त्रुटी दूर करण्यास सुरुवात केली आहे.
सोमवारी (दि. २३ जून) संदीप भाऊ कदम हे आपल्या मुलीच्या उपचारासाठी या रुग्णालयात गेले असता, इंजेक्शन उपलब्ध नसल्याने ते बाहेरून आणावे लागले. तसेच, इतर अनेक असुविधाही त्यांच्या लक्षात आल्या. याबाबत त्यांनी त्वरित रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली व माध्यमांतून माहिती दिली. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना जोशी, वडगाव मावळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. भूषण बडेकर आणि वैद्यकीय अधिकारी संकेत मळेकर यांनी कान्हे फाट्यातील सरकारी रुग्णालयाची पाहणी केली.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे मावळ तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ, युवा आघाडी अध्यक्ष संदीप कदम, महिला आघाडी अध्यक्षा मनिषा ओव्हाळ, माजी अध्यक्ष बाळकृष्ण टपाले, उपाध्यक्ष निलेश टपाले, सचिव लहू लोखंडे, महासचिव अक्षय साळवे, वडगाव शहर उपाध्यक्ष पवन उदागे, युवा नेते सुमित साळवे, ज्येष्ठ नेते शंकर कदम आणि युवा सचिव प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते. अधिकार्यांनी रुग्णालयातील तातडीच्या त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले असून, रुग्णालयातील सर्व सेवा सुरळीत करण्यात आल्या आहेत. कोणालाही अडचण आल्यास वंचित बहुजन युवा आघाडीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
About The Author

