
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत शहरातील स्वच्छता, कचरा संकलन, उद्यान व्यवस्थापन, विद्युत पथदिव्यांची देखभाल यासह विविध नागरी सुविधा नियमितपणे उपलब्ध करून दिल्या जातात. याबाबत काही तक्रारी असल्यास त्या नोंदविण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात यावे लागते, यामुळे गैरसोय होते तसेच या संदर्भातील तक्रारी विविध माध्यमातून प्राप्त होत असल्याने त्यांच्या नोंदणी आणि निवारण प्रक्रियेत सुसंगतता राहात नाही. याशिवाय, दूरध्वनीवर तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता व्यस्ततेमुळे प्रतिसाद मिळणे कठीण जाते. तक्रारींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत खालील पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
१. स्वच्छता व आरोग्य, २. विद्युत पथदिवे, ३. पाणीपुरवठा, ४. उद्यान विभाग, ५. दिव्यांग कल्याण, ६. सामान्य प्रशासन, ७. लेखा विभाग, ८. नगररचना विभाग या विभागा संबंधित नागरिकांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत खालील माध्यमांवर तक्रारी नोंदविता येतील .तक्रार नोंदविण्यासाठीचे माध्यम
१. कॉल किंवा व्हाट्सअँप क्रमांक ९८९०६१६०८९
२. फक्त कॉल क्रमांक १८००२३३२७३४
प्राप्त तक्रारी कार्यालयीन वेळेत नोंदविण्यात येतील आणि प्राधान्यक्रमानुसार तक्रारीच्या स्वरूपानुसार कार्यवाही सुनिश्चित करण्यात येईल.
नागरिक, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी वरील सुविधाचा वापर करून तक्रारी नोंदवाव्यात. तक्रारीच्या स्वरूपानुसार तक्रारीचा निपटारा त्वरित करण्यात येईल. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी वरील दोन्ही क्रमांक जतन करून ठेवावेत व आवश्यकता भासल्यास तत्काळ संपर्क साधावा.
About The Author

