
हाणेगाव : फारुख पटेल
देगलुर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून हाणेगावला पाहीले जाते पण विकासाच्या बाबतीत मात्र सर्वात छोटी आहे कारण की १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत ६ वार्ड असुन त्यात वार्ड क्रमांक २ मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असुन मोठा क्षेत्रफाळाचा परीसर असल्यामुळे लोकवस्ती मोठी आहे पण गल्लीत जाण्यासाठी व्यवस्थीत रस्तेच नाहीत वर्षाला पावसाळ्यात या रस्त्यावर मुरुम गोटा टाकुन तोंड पुसण्याचा काम बरेच वर्षापासुन चालु आहे जवळजवळ पंचवार्षीक कार्यकालच संपला पण रस्ते नाली काही बनले नाहीत म्हणुन लोकांचा रोष वाढत आहे मतदार लोकप्रतिनिधीवर विश्वास ठेऊन मतदान करतात पण प्रतिनिधी विश्वास घात करत असेल तर मतदान द्यावा तरी कोनाला असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.
केंद्र शासनाचा राज्य शासनाचा भरपुर निधी ग्रामपंचायतीला येत असताना रस्तेच होत नसेल तर निधी चालला कुठे असा देखील प्रश्न नागरीकांना पडला आहे .सरकारी दवाखान्या समोरील भागात विशेष करुन या वार्डात शेतकरी मजुरकार यांचा जास्त भरणा आहे याच परीसरात विद्युत् वितरण कंपनी,यशोदीप इंग्लीश स्कुल,बालवाड्या आहेत,गावात मोठा परीसर म्हणुन याला बघीतले जाते येथील लोकांना लागतो काय रोड नाली पाणी विज हेच नसतील तर विकास कसला म्हणुन संबंधीत ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन सि सी रस्ते बनवुन द्यावे अशी मागणी स्थानीक नागरीकातुन होत आहे.
About The Author
