Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी नगरसेवक असताना आपल्या पदाचा गैरवापर करून रावेत सेक्टर नंबर. २९ मधील भोंडवे कॉर्नर ते जाधव वस्ती या रस्त्यावरील एम एस ई बीच्या प्लाॅट शेजारी असणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुमारे दोन एकर जागेमध्ये घुसखोरी करून महापालिकेचे कंपाऊंड तोडून प्रथम कंटेनर टाकून आपले कार्यालय सुरू केले व त्या ठिकाणी नंतर हळूहळू अनधिकृतपणे पक्के बांधकाम करून आलिशान, असे कार्पोरेट कार्यालय सुरू केले असल्याची माहिती शिवशाही व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी निवेदनाद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

त्यामुळे महापालिकेच्या जागेवर घुसखोरी करून कार्यालय सुरू केल्याबद्दल माजी मोरेश्वर भोंडवे यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच ते अनधिकृत कार्यालय त्वरित पाडावे व नगरसेवक पदाचा गैरवापर केला म्हणून मोरेश्वर भोंडवे यांना निवडणूक लढवण्यास ६ वर्षाची बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी सुमारे सहा वर्षांपूर्वी नगरसेवक असताना प्राधिकरणाच्या ले आउट मधील पिंपरी चिंचवड महापालिकेकडे वर्ग झालेल्या सुमारे दोन एकर जागेवर आपले आलिशान कार्पोरेट ऑफिस सुरू केले त्या जागेचे आजचे बाजार मुल्य हे सुमारे ७० करोड रुपये ते ८० करोड रुपये आहे. त्या ठिकाणी महापालिकेचे कंपाउंड तोडून मोरेश्वर भोंडवे यांनी ती सर्व जागा आपली असल्याप्रमाणे सहा वर्ष वापरली आहे. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या समर्थकांना बरोबर घेऊन साम्राज्य उभारले आहे त्या अलिशान कार्यालयात मोठ्या डील केल्या जात आहेत, तेथे शहरातील मोठं मोठ्या सेटलमेंट होत आहेत याच कार्यालयात रावेत, किवळे या भागातील बिल्डरलांना बोलवून अनेक तोडजोडी केल्या जात आहेत, मोरेश्वर भोंडवे यांना या कार्यालयात भेटण्यासाठी शहरातील मोठ-मोठ्या हस्ती या ठिकाणी येत असतात महापालिकेचे अधिकारी, अभियंते ,कर्मचारी त्या ठिकाणी भेटण्यासाठी येतात, सर्वांना माहीत आहे ही जागा महापालिकेच्या मालकीची आहे. मात्र एकाची ही हे बोलण्याची हिंमत होत नाही, त्या ठिकाणी दररोज आलिशान गाड्या आलेल्या दिसतात.

नुकताच दोन जून रोजी मोरेश्वर भोंडवे यांनी आपला वाढदिवस तेथे साजरा केला होता. त्यावेळी भव्य दिव्य असा मंडप त्या ठिकाणी टाकण्यात आला होता, त्यावेळी शहरातील दिग्गज मंडळी शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी आले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ओ एस डी विकास पाटील ही त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आले होते , त्याच कार्यालयात बसून त्यांनी पाहुणचार घेतला होता.

मोरेश्वर भोंडवे हे कै. रामकृष्ण मोरे सरांचे जवळचे कार्यकर्ते होते ते कधी कधी त्यांचे वाहन ही चालवत असत कै. रामकृष्ण मोरे सरांचे २००३ मध्ये निधन झाले. त्यानंतर मोरेश्वर भोंडवे हे एकाएकी प्रकाश झोतात आले. त्यांच्याकडे अचानक प्रचंड पैसा आला त्यावेळी रावेत या ठिकाणी लोक जाण्यासाठी घाबरत होते,रस्ते अरुंद होते त्यावेळी लोकांच्या दारात साधे शौचालय नसायचे त्यावेळी मात्र मोरेश्वर भोंडवे यांच्या दारात आलिशान गाड्या होत्या. मोरेश्वर भोंडवे यांचा कोणताही मोठा व्यवसाय नाही ते उद्योजक नाहीत किंवा नामवंत बिल्डर नाही मात्र त्यांच्याकडे अचानक एवढी संपत्ती आली आहे, गेली १५ ते २० वर्षापासून ते गणेश मंडळ तसेच नवरात्री उत्सवात ते अनेक मंडळांच्या लाखों रुपयांच्या पावत्या फाडतात ,नेत्यांच्या वाढदिवसाला व स्वतःच्या वाढदिवसाला शहरात मोठमोठे होर्डिंग लावतात त्यासाठी लाखों रुपये खर्च करतात. रावेत ,किवळे भागात त्यांची प्रचंड दहशत आहे तेथील बिल्डर ठेकेदार वैतागले आहेत गेल्या दहा ते बारा वर्षात ते नगरसेवक असताना त्यांनी प्रचंड पैसा कमविला आहे.ते स्वतः साठी स्वखर्चाने मोठे कार्यालय घेऊ शकतात , मात्र त्यांना महापालिकेच्या मालकी हक्काच्या जागेवर ताबा मारायचा आहे, सध्या त्या जागेत महापालिकेने जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधले आहे, ओपन जिमचे साहित्य बसवलेले आहे, त्या ठिकाणी शनिवारी व रविवारी आठवडे बाजार भरतो.

माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी महापालिकेच्या जागेत घुसखोरी करून एक प्रकारे ताबा मारला आहे. त्यामुळे आयुक्तांनी त्यांच्यावर प्रथम गुन्हा दाखल करावा, तसेच ते आलिशान कार्यालय व कंटेनर ताबडतोब येथून काढून टाकावा व मोरेश्वर भोंडवे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर केला म्हणून त्यांना निवडणूक लढवण्यासाठी सहा वर्षाची बंदी घालावी अशी मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *