
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
आमदार सुनील शेळके यांनी ओला उबेर चे ॲप लोणावळा शहरात बंद करा अशी ठाम भूमिका घेतल्याने टॅक्सी मालक चालक संघटनेकडून आमदार सुनील शेळके यांचा सत्कार करण्यात आला.
लोणावळा शहरातील नागरिकांच्या रोजगाराचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासमोर ठामपणे मांडला. लोणावळा शहरात ओला ,उबेर या भांडवलदार कंपनीचे ॲप बंद करण्याबाबत मागणी केल्याप्रकरणी आमदार सुनील शेळके यांचे लोणावळा शहर टॅक्सी चालक मालक संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आले तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनील शेळके यांचा सत्कार केला. ओला उबेर या कंपन्यांमुळे स्थानिक वाहन चालक मालक यांचे नुकसान होते. लोणावळा शहर पर्यटन नगरी असल्यामुळे शहरात स्थानिकांना प्रथम रोजगार मिळायला हवा याकरता ओला उबेर ला बंदी असावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. आमदार सुनील शेळके यांनी संघटनेच्या या मागणीला ठाम पाठिंबा देऊन पुणे जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत संघटनेच्या या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली. लोणावळा शहरात ओला उबेर चे ॲप बंद करा अशी सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या ठाम भूमिकेमुळे संघटने कडून आमदार सुनील शेळके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय मावकर, सल्लागार निखिल कवीश्वर, लक्ष्मण दाभाडे, अविनाश तिकोणे, नरेंद्र निकाळजे, अमोल शेडगे, मंगेश कचरे, अभिजीत माझीरे, मिलिंद शिरस्कर, शुभम जाधव, विठ्ठल मंदरूपकर, किरण परदेशी, निखिल गायखे, गणेश कडूआदी पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author
