
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगरपरिषद व रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त तळेगाव दाभाडे जनजागृती रॅली सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी सकाळी दहा वाजता तळेगाव नगरपरिषद मारुती मंदिर चौक या ठिकाणी सुरू होणार आहे.
या जनजागृती रॅलीमध्ये प्लास्टिकचा वापर कमी करणे,पर्यायी वापर करणे,रिसायकल करणे,प्लास्टिक मुळे होणारा जीविताला धोका याच्या स्लोगन व पथनाट्य स्पर्धा या रॅलीमध्ये होणार आहेत.
तरी तळेगाव शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग घेऊन “स्वच्छ तळेगाव,सुंदर तळेगाव” प्लास्टिक मुक्त तळेगाव, साठी आपला हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक,उपमुख्याधिकारी ममता राठोड,शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सौ शिल्पा रोडगे,गोल्डन रोटरीचे अध्यक्ष संतोष परदेशी,उपाध्यक्ष प्रशांत ताये,सेक्रेटरी प्रदीप टेकवडे यांनी सर्वांना आवाहन केलं आहे.
या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख रो कविता खोल्लम या नियोजन करत आहेत.
About The Author

