
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
शाहूनगर येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. वाचनालयाचे सचिव राजाराम वंजारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक भरत गायकवाड हे होते. जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर माहिती सांगितली. प्रास्ताविक मनीषा पाटील यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे महादेव पवार आणि वाचक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, सहायक ग्रंथपाल प्राजक्ता पवार, रवींद्र अडसूळ, गणेश सहाणे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गणेश सहाणे यांनी केले.
About The Author

