
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये प्लास्टिक बंदी राबविण्यात आली. महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय: जा.क्र/न.प्र.सं./का०६/२०२५/SUP/४७०८ (दि. १७) जून २०२५ चे पत्रानुसार प्लास्टिक बंदी मोहीम मा. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन (Ending Plastic Pollution Globally)’ या संकल्पनेंतर्गत नगरपरिषदेने पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
केंद्र शासनाचे पर्यावरण विभागाचे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रथम व द्वितीय सुधारणा नियम दिनांक १२/०८/२०२१ अन्वये सन-२०२२ पर्यंत सिंगल युज प्लास्टिक वस्तूंचा वापर करण्याकरिता दि ३०/०९/२०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग वर बंदी घालणेत आली आहे.
त्यानुषंगाने मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमधील बॉम्बे वर्कशॉप पासून मारुती मंदिर ते जिजामाता चौक येथे प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेमध्ये एकून १६ व्यापाऱ्यांकडून १२ ते १३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच नागरिकांना प्लास्टिक बंदीचे महत्व सांगन्यात आले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या या मोहीमेमुळे शहराच्या पर्यावरणात सकारात्मक बदल घडून येईल आणि प्लास्टिक प्रदूषणाच्या विरोधात एक चांगला संदेश मिळेल या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे.
या वेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यक्षम उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्यासमवेत आरोग्य निरीक्षक सुनील काळकुटे, वरिष्ठ लिपिक भास्कर वाघमारे ,कर व निर्धारण अधिकारी मोनिका झरेकर,बांधकाम अभियंता गौरी चव्हाण, भांडार विभाग प्रमुख निखील बोरुडे,पर्यवेक्षक पुरुषोत्तम तेजी ,पर्यवेक्षक राहुल आगळे, उद्यान समन्वयक रणजीत सूर्यवंशी, कुणाल आधागळे, मंगेश मोईकर, मनोज शेटे, देविदास पुंड, सागर वाघेला,आकाश बिडलान,अंकुश जाधव, प्रकाश मकवाना व इतर नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
About The Author

